शिरूर तालुक्यातील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्य आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रमशिल प्राचार्य तुकाराम शिरसाट यांना फिलिपिन्स या देशातील एफ. बी. एस. टी. टी. बी. बी. सी. युनिव्हर्सिटी फ्रॉम यूएसए यांच्याकडून डॉक्टर ऑफ एज्युकेशन हॉनरीज् कॉसा ही प्रतिष्ठित पदवी मेक्सिको, पाम्पांगा, फिलिपाइन्स येथे दिनांक २८ मार्च २०२६ प्रदान करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोउत्कृष्ट योगदानाबद्दल व मातृभाषेतील उपयोजित लेखनातील संशोधन प्रबंध दोन वर्षात चार सेमिस्टर मध्ये पूर्ण करून प्रबंधाचे सादरीकर विदयापीठात करण्यात आले तसेच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या विविध संशोधनाची दखल घेवून ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या जागतिक शैक्षणिक कार्याची दखल घेत त्याला अधिकची बळकटी देत त्यांना आंतरराष्ट्रीय शांतता शिक्षण डिप्लोमा अवॉर्ड प्रदान करण्यात आले. शिक्षण, जागतिक एकात्मता, नेतृत्व आणि शैक्षणिक उत्कृष्टता या प्रती असलेल्या बांधिलकीचीदखल घेण्यात आली असून त्यांच्या योगदानाचा गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार देवून करण्यात आला तसेच त्यांच्या शैक्षणिक नाविण्यपूर्ण उपक्रमाची दखल घेवून प्राचार्य तुकाराम शिरसाट यांना YSFS-ILRAP,FBST-TBBC USA आणि ISS-BMAPL या सारख्या जागतिक संशोधन आणि शैक्षणिक संस्थेचे सन २०२६ २७ या वर्षाचे अधिकृत सदस्यत्व देखील देण्यात आले आहे त्यामुळे जागतिक स्तरावरील शैक्षणिक व संशोधन कार्यात सहभागी होता येणार आहे. त्याचा फायदा आपल्या शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी शिक्षकां सांठी पुढील काळात केला जाईल. असे मत प्राचार्य डॉ तुकाराम शिरसाट यांनी व्यक्त केले. यासाठी शास्त्रज्ञ डॉ. प्रतीक मुणगेकर, मुंबई यांनी मार्गदर्शन केले. या पदवी सन्मानामुळे जगभरातील विद्यार्थी, शिक्षक, संशोधक यांच्याबरोबर शैक्षणिक आंतरराष्ट्रीय देवाण घेवाण करण्यास वाव मिळणार आहे. जगभरातील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून तेथील शिक्षण पद्धतीचा अनुभव घेण्यास मदत होणार आहे. प्राचार्य तुकाराम शिरसाट यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल अनेक शिक्षण प्रेमीकडून जागतिक शैक्षणिक स्तरावर मराठी पाऊल पुढे पडते आहे त्यामुळे सर्व स्तरातून कौतुक व आभिनंदनाचा वर्षाव होत आहे, संस्थेच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई पलांडे कार्याध्यक्ष अँड अशोकराव पलांडे, सचिव सुरेश रामराव पलांडे उपाध्यक्ष सुभाष आबा पलांडे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा जितेंद्रकुमार थिटे, सीईओ मंगेश मोरे, मुख्याध्यापक सुधिर ढमढेरे, मुख्याध्यापक संतोष दौंडकर व सुर्व शिक्षक वृंदाने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा – प्राचार्य तुकाराम शिरसाट यांना डॉक्टरेट पदवी....
April 01, 2026
0

Post a Comment
0 Comments