*परभणी येथे ५ सप्टेंबरला आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आमरण उपोषण*..."प्रलंबित २१ मागण्यांवर बैठकीसाठी ५ आमदारांचे मंत्री अतुल सावे यांना पत्र".
राज्यातील विमुक्तजाती व भटक्या जमाती अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या शिक्षक दिनी, म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे राज्यव्यापी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. 'महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघ'तर्फे या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्यातील ५ आमदारांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना तात्काळ बैठक घेऊन तोडगा काढण्याचे पत्र दिले आहे. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे
राज्य अध्यक्ष बालाजी मुंडे आणि राज्य सरचिटणीस किशन पुंड यांच्यासह कार्यकारणी सदस्यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे योग्य प्रकारे समायोजन करावे यासह प्रमुख २१ मागण्याचा सामावेश आहे. तोडगा काढण्याचे पत्र दिले आहे. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे राज्य अध्यक्ष बालाजी मुंडे
आणि राज्य सरचिटणीस किशन पुंड यांच्यासह कार्यकारणी सदस्यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे योग्य प्रकारे समायोजन करावे यासह प्रमुख २१ मागण्याचा सामावेश आहे. प्रशासकीय घडामोडी आणि पाच आमदारांचा पुढाकार. आ. सुधाकर आडुबाले, आ. किरण सरनाईक, आ. साजिदखान पठाण, आ. नितीन देशमुख आणि आ. अनिल मांगुळकर या पाच आमदारांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना पत्र लिहून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत तत्काळ बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय, प्रलंबीत मागण्या आणि वेळेवर न मिळणारे वेतन यामुळे तीव्र असंतोष आहे. शासनाने ५ सप्टेंबरपूर्वी सकारात्मक निर्णय न घेतल्यास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरणम उपोषण अटळ आहे. किशन पुंड, राज्य सरचिटणीस. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अमरावती विभागातील आश्रमशाळा संघटनेचा पाठींबा असल्याचे विभागीय सचीव प्रमोद मुनेश्वर यांनी सांगितली.
परभणी येथे दिनांक ५ सष्टेंबर 2026 पासून आमरण उपोषण
स्थळ : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आपल्या शिक्षक बांधवांना विभागीय अध्यक्ष श्री. प्रकाश मराठे व प्रवीण पवर राज्य सहसचिव यांनी केलेले आहे.

Post a Comment
0 Comments