.. राज्यातील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अनुदानीत आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून, त्यांना अद्यापही भविष्यानिधीचा परतावा/ना परतावा लाभ मिळालेला नाही. BDS प्रणाली ऑनलाईन बंद असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.
सदर कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर सेवा बजावूनही त्यांना त्यांच्या हक्काच्या निधीपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ BDS प्रणाली सुरू करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
ही बाब अत्यंत निंदनीय व क्लेशदायक असून, शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी भावना व्यक्त होत आहे.महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ..तथा कार्यकारी सदस्य पदाधिकारी..

Post a Comment
0 Comments