Type Here to Get Search Results !

भविष्य निर्वाह निधी (PF) परतावा प्रणाली ऑनलाईन सुरू.....आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहन..

 प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर भविष्य निर्वाह निधी (PF) परतावा व ना-परतावा प्रणाली ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील सेवानिवृत्त तसेच मयत कर्मचारी बांधव, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सदर लाभ मिळवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले प्रस्ताव तातडीने सादर करावेत आणि त्याचा नियमित पाठपुरावा करावा, असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष प्रकाश मराठे सर यांनी केले आहे. तसेच संबंधित प्रस्ताव मा. सहायक संचालक स्तरावरून लवकरात लवकर निकाली काढावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधितांनी आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.                                                 Channel ला like and subscribe करा... 🌹🙏

Post a Comment

0 Comments