आश्रमशाळांमधील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि कल्याणकारी प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी आश्रमशाळांच्या विकासासाठी, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी मोलाचे योगदान दिले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मा. पुंड सर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या नेतृत्वगुणांचे, प्रामाणिकपणाचे व समाजहिताच्या बांधिलकीचे कौतुक केले. आश्रमशाळा क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना मा. किसनराव पुंड सर यांनी हा सन्मान वैयक्तिक नसून आश्रमशाळा क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व शिक्षक, कर्मचारी व सहकाऱ्यांचा असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही शिक्षण, समाजसेवा आणि संघटनात्मक कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments