अखेर राज्यातील शिक्षकांच्या निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणाचा मुहूर्त ठरला. संपूर्ण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कलाध्यापक विद्यालयातील ज्या-ज्या शिक्षकांची अहर्ताकारी सेवा १२ वर्षे पूर्ण झाली आहे त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी व ज्या शिक्षकांची अहर्ताकारी सेवा २४ वर्षे पूर्ण झाली आहे त्यांना निवड वेतन श्रेणी मिळण्यासाठी २० जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार अनिवार्य आहे. या प्रशिक्षणाचे परिपत्रक पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. नंदकुमार बेडसे यांनी काढले आहे त्यानुसार नोंदणी केलेल्या सर्व पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण आपापल्या तालुक्यात १३ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार असून याबाबतचे नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सुरू आहे.शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर अनुक्रमे १२ व २४ वर्षे पूर्ण झालेल्यांना व निर्धारित प्रशिक्षण, काही नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या शिक्षकांना शासनाच्या शिक्षण विभागाकडून अनुक्रमे वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी दिली जाते. त्यासाठी शिक्षकांना दहा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.
दरवर्षी निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रशिक्षण जून महिन्याच्या कामाचा पहिला टप्पा सुरू होता. या राष्ट्रीय कामी निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेले बहुतांशी शिक्षक कार्यरत होते, त्यामुळे जून महिन्यात प्रशिक्षणाचे आयोजन करता आले नाही. अखेर ६ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या प्रशिक्षणाचा मुहूर्त सापडला असून दिपावाळीच्या सुट्टीला जोडून म्हणजेच १३ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत प्रशिक्षण होणार आहे. दोन्ही टप्पात नाव नोंदणी केलेल्या सर्व पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे.
१७ नोव्हेंबर असा आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी १३ ते २२ नोव्हेंबर असा आहे. संबंधित शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीत व शालेय कामकाजाच्या दिवशी हे दहा दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सुट्टी संपली की नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात शासनाच्या पेट परीक्षेचे नियोजन आहे.

Post a Comment
0 Comments