आझाद मैदान: वाढीव टप्पा अनुदानाच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देत ३१ मार्च २०२७ पूर्वी वाढीव टप्पा अनुदान देण्याची सरकारची भूमिका जाहीर केली.
या घोषणेमुळे राज्यातील हजारो विनाअनुदानित शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब तसेच वाढीव टप्पा अनुदानाच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, अनेक शिक्षक आमदार, सोबत मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.
आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी शिक्षक बंधू-भगिनींशी संवाद साधत सरकारच्या एकंदरीत भूमिकेविषयी माहिती दिली. यापूर्वी देखील सरकारे होती मात्र देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील सरकारनेच वेळोवेळी विनाअनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ दिलेले आहे त्यामुळे भविष्यात देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकार शिक्षकांना न्याय देईल याबाबत मनात शंका ठेवू नये. राजकारणासाठी अनेक विरोधक आपल्याला दिशाभूल करण्यासाठी येतील मात्र त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय केलं हा देखील प्रश्न त्यांना विचारावा असे आवाहन केले.,शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, निश्चित मुदतीत निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिक्षक समन्वयक संघाचे खंडेराव जगदाळे अनिल परदेशी, संजय डवरे, भारत जामनिक, संजय रंगारी, रहाटे काका, करतार सिंग ठाकूर, शिवराम म्हस्के आदी उपस्थित होते.*
दरम्यान, जळगाव भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने वाढीव टप्पा अनुदानासंदर्भातील निवेदन आमदार मंगेशदादा चव्हाण यांना सादर करण्यात आले होते. या प्रश्नावर त्यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल शिक्षकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
सरकारच्या घोषणेमुळे वाढीव टप्पा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता ३१ मार्च २०२७ पूर्वी या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे..
भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने टप्पा अनुदान मिळावा यासाठी पाठपुरावा करत असणारे शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील सर, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश सूर्यवंशी, जिल्हा चिटणीस गुलाबराव साळुंखे सर, मोरसिंग जाधव सर ,जिल्हा उपाध्यक्ष सौ रोशनी साळुंखे मॅडम, राम पाटील सर, निलेश पाटील सर , राहुल जाधव , भूषण गुंजाळ, वैभव लोधे व तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नामदार गिरीशभाऊ महाजन साहेब, नामदार दादाजी भुसे व आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे आभार व्यक्त केले..
Post a Comment
0 Comments